वन प्लस कंपनी लवकरच OnePlus Pad लाँच करणार आहे. या पॅडची किंमत तसेच फीचर्स बद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. येत्या सात फेब्रुवारीला हे पॅड लाँच होईल. दरम्यान, OnePlus TV 65 Q2 Pro हा भारतातील वनप्लसचा पहिला टॅबलेट असणार आहे.
वन प्लस पॅडबद्दल अधिक माहिती
- चीनी तंत्रज्ञान कंपनीने तयार केलेल्या वन प्लस पॅडचा अधिकृत मायक्रोसाइटवर प्रोमो फोटो शेअर करण्यात आला आहे.
- या टॅबलेटच्या मागील बाजूस मध्यभागी कॅमेरा मोड्यूल असु शकतो. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- हा टॅबलेट हिरव्या रंगामध्ये उपलब्ध केला जाणार आहे. भविष्यात हा टॅबलेट आणखी रंगांमध्ये देखील बाजारात उपलब्ध होऊ शकतो.
- One plus चा हा पहिला Android टॅबलेट असेल तसेच यासोबत अन्यही उत्पादने लॉन्च केली जाणार आहेत.
- वनप्लस पॅडला पॉवर देण्यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या टॅब्लेटसाठी हा चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातंय.
- यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असू शकतो.
- हे 10900mAh बॅटरीसह येऊ शकते. तसेच 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असू शकतो.
- वनप्लस पॅडमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.1 सपोर्ट दिला जाऊ शकतो. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर असेल.