Sunday, August 3, 2025

मुंबईत तीन वर्षांत दुसऱ्यांदा कोरोनाची शून्य रुग्ण नोंद

मुंबईत तीन वर्षांत दुसऱ्यांदा कोरोनाची शून्य रुग्ण नोंद

मुंबई (प्रतिनिधी ): योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे कोरोनावर मात करण्यात पालिकेला यश आले असून आज तीन वर्षांत २४ जानेवारीनंतर दुसऱ्यांदा शुक्रवार २७ जानेवारी रोजी कोरोना बाधित शून्य रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रित ठेवण्यात पालिकेला यश आले आहे.


आज शुक्रवारी दिवसभरात शून्य कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार २४२ वर स्थिरावली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. दरम्यान, दिवसभरात ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ४८० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे १५ सक्रिय रुग्ण आहेत.

Comments
Add Comment