वैभववाडी (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचारार्थ वैभववाडीतील शाळा व कॉलेजना भेटी दिल्या. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी दौरा पार पडला. वैभववाडी तालुक्यातील यशवंतराव चव्हाण विद्यालय व कॉलेज आचिर्णे, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, विद्या मंदिर सोनाळी, नवभारत स्कूल कुसुर, भुईबावडा विद्यालय, माध्यमिक विद्यालय उंबर्डे, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी, माध्यमिक विद्यालय करूळ या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्याशी संवाद साधला.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, भालचंद्र साठे, सज्जनकाका रावराणे, सुधीर नकाशे, नेहा माईणकर, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, बबलू रावराणे, उत्तम सुतार, संजय सावंत, रोहन रावराणे, बंड्या मांजरेकर, सुप्रिया तांबे, राजन तांबे, प्रदीप नारकर, यामिनी वळवी, सुंदरी निकम, रत्नाकर कदम, एस.एम. बोबडे, पप्पू इंदुलकर, मनोहर फोंडके, नरेंद्र कोलते, बाळा कदम, प्रकाश सावंत, बाजीराव मोरे, तात्या पाटील, पुंडलिक पाटील, किशोर दळवी, प्रकाश पाटील, स्वप्निल खानविलकर व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते