
हरसूल: दोन महिन्यांपूर्वी नाशिकमधील वेळूजे येथील निवृत्ती दिवटे वस्तीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत पावलेल्या आर्यन नावाच्या सहा वर्षीय बालकाच्या कुटुंबियांना वन अधिकाऱ्यांच्या हस्ते वीस लाखांचा धनादेश देण्यात आला. उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम विभाग यांच्या कार्यालयातर्फे सबंधित ही मदत कुटुंबियांना करण्यात आली.
यावेळी नाशिक पश्चिम वनविभागाचे सहवनसंरक्षक गणेश झोळे, राजेश पवार वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर चव्हाण, वनपरिमंडळ अधिकारी त्रंबकेशवर, वन परिमंडळ अधिकारी अरुण निंबेकर, इनामदार, वनरक्षक कैलास महाले आणि वन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धनादेश सुपूर्द केला.