महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळच्या इसाने कांबळे तर्फे महाड या गावालगतच्या पुणे मार्गावरील ट्रांसफार्मरला चिटकून एका परप्रांतीय इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाणे आणि वीज मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने हा इसम या ठिकाणी गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या ठिकाणी ट्रांसफार्मरच्या काही प्लेट्स काढल्याचे निदर्शनास आले असून हे कृत्य करीत असतानाच शॉक लागल्याने या अपघातामध्ये तो जळून खाक झाला.
यासंदर्भात प्राथमिक माहितीनुसार हा चोरटा मध्य प्रदेश मधील आजमगढ गावचा रहिवासी असून त्याचे नाव मोहम्मद अहमद असल्याचे समजते.
पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.