Sunday, October 19, 2025
Happy Diwali

लाराकडे विंडिज क्रिकेट बोर्डाची मोठी जबाबदारी

लाराकडे विंडिज क्रिकेट बोर्डाची मोठी जबाबदारी
छागुआरामास (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्यावर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. वेस्ट इंडिजच्या सर्व आंतरराष्ट्रीय संघांचे मार्गदर्शक म्हणून लाराला नियुक्त केले आहे. यासोबतच मंडळाच्या अकादमीचे कामही पाहणार आहेत. बोर्डाचे क्रिकेट संचालक जिमी अॅडम्स म्हणाले, "लारा सर्व प्रशिक्षकांना मदत करेल आणि खेळाडूंना सल्ला देईल जेणेकरून ते त्यांच्या खेळात सुधारणा करू शकतील. एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्याची नियुक्ती खूप महत्त्वाची आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा