नाशिकध्ये ६०४ किलो वजनाची भांग जप्त

नाशिक: नाशिकमधील शालिमार येथील वावरे लेन परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ६०४ किलो भांग जप्त केली आहे. याप्रकरणी पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


आडगाव शिवार येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या पवन सुकदेव वाडेकर (वय २५ वर्षे) व वावरे लेन येथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर बाळू शेलार (वय २८ वर्षे) यांना पथकाने ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी दोघांकडे ६०४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा भांगचा साठा आढळून आला. या साठ्याची किंमत ३ लाख ३० हजार १५३ रुपये इतकी आहे.


पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री, खरेदी, वाहतूक व साठेबाजी रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पथकातील पोलिस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वावरे लेन येथे दोघे भांग हा मादक पदार्थ विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार माहितीची खात्री करून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, एच. के. नागरे, पी. बी. सुर्यवंशी, अंमलदार नांद्रे, गणेश भामरे, देवकिसन गायकर, रंजन बेंडाळे, विनायक आव्हाड, भारत डंबाळे, नितीन भालेराव आदींच्या पथकाने वावरे लेन येथे सापळा रचून कारवाई केली.

Comments
Add Comment

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा

मीरा-भाईंदरमध्ये महाविकास आघाडीत वादंग

काँग्रेस जिल्हा प्रवक्त्याचा राजीनामा; ‘निर्भय भारत आघाडी’ मैदानात भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील

१ फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार!

४० टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय मुंबई : १ फेब्रुवारीपासून तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान

जीएसटी संकलनातून सरकारच्या तिजोरीत १.७४ लाख कोटी जमा

दरकपात असूनही डिसेंबरमध्ये मजबूत जीएसटी संकलन नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिसेंबर २०२५ मधील वस्तू आणि सेवा कर

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा