Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तमहत्वाची बातमी

'ही' अट मान्य केल्यास झोमॅटोवर फ्री डिलिव्हरी

ऑनलाईन जेवण मागवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता झोमॅटोने फ्री डिलिव्हरी सेवा सुरु केली आहे. मात्र, यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे.


झोमॅटो या फुड डिलिव्हरी अ‍ॅपने मार्च २०२२ मध्ये १० मिनिट फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली होती. ही सेवा झोमॅटो इन्स्टंट म्हणून ओळखली जात होती. दिल्ली एनसीआर आणि बंगळुरू येथे या सेवेला सुरुवातही झाली होती. मात्र, कंपनीला ही सेवा देण्यात अनेक अडचणी येत होत्या.


१० मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी कंपनीला कमी ऑर्डर मिळत होत्या. त्यामुळे कंपनीने जाहीर केले की, ही डिलिव्हरी सेवा थांबवण्यात येणार नाही. परंतु या सेवेचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला तीन महिन्यांसाठी १४९ रुपये मोजावे लागतील. दरम्यान या सेवेद्वारे फुड ऑर्डर करणाऱ्यांना १० किमीच्या रेडियसमध्येच अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी मिळेल.



'ही' गोष्ट करावी लागणार...


यासाठी तुम्हाला झोमॅटो गोल्डची मेंबरशीप घ्यावी लागेल. यामध्ये यूझर्सला मोफत डिलिव्हरी (१० किमीच्या रेडियसमध्येच), विनाविलंब डिलिव्हरीची हमी, गर्दीच्या वेळी व्हीआयपी अ‍ॅक्सेस आणि इतर अनेक ऑफर्स देखील देण्यात येतील.

Comments
Add Comment