
मुंबई : अनेकांचं आपल्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम असतं. त्यांच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी ते विविध गोष्टी करतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करणं त्यांना आवडतं. त्यांचे व्हिडिओ पाहुन लोकही भावुक होतात आणि ते व्हिडिओ शेअर करतात.
अशाच एका कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन तुमचे डोळे पाणावतील. या व्हिडिओमध्ये एक लहान कुत्रा त्याच्या जन्म दाखल्यावर स्वाक्षरी करतो आहे. त्याची स्वाक्षरी म्हणजे त्याच्या हाताच्या पंजाचा ठसा असून मालक त्याच्या हाताने त्याला तो दाखल्यावर उमटवायला मदत करत आहे.
हा क्युट व्हिडिओ तुम्ही पुन्हा-पुन्हा पाहाल. प्राणीप्रेमी तर हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणावर शेअर करत आहेत. कुत्र्याच्या पंजाची प्रिंट खूपच सुंदर दिसते. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने अत्यंत गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, तुम्ही कधी लहान बाळाला स्वाक्षरी करताना पाहिले आहे का?View this post on Instagram