पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण आता निवडणूक कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. याआधी २७ फेब्रुवारीला मतदान होणार असे जाहीर केले होते पण आता हे मतदान एक दिवस आधीच म्हणजे २६ फेब्रुवारीला होणार आहे.
राज्यात होऊ घातलेल्या बारावीच्या परीक्षांमुळे पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतदानाची तारीख बदलण्यात आलेली आहे. परंतु, मतमोजणी ही २ मार्च रोजीच होणार आहे.