
मुंबई: गेल्या अडीज वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर वेळोवेळी नवनवीन केसेसे टाकता येतील याचे प्रयत्न करण्यात आले. कुठल्याही परिस्थीतीत याला अडकवा अशी जबाबदारीच तत्कालीन सीपी संजय पांडे यांच्यावर सोपण्यात आल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हे देखील वाचा.. शिंदेच्या गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही
पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं त्या उद्धवजींबाबत माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. पण खुद्द उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझा एक साधा फोनही उचलला नाही. माझ्याशी साधं बोलण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही
बाळासाहेबांचा आम्ही फोटो लावतो, तुम्ही मोदींचा लावा पाहु! असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी तुम्हीच बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो लावला अन् 2014च्या निवडणूकीत निवडून आलात. त्यामुळे आधी इतिहास तपासून घ्या असा सल्लाच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. दरम्यान बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब महाराष्ट्राचे आहेत, अशी भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली.