Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

मुंबईत बोगस ईडी अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची लूट

मुंबईत बोगस ईडी अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची लूट

मुंबई : ईडी अधिकारी असल्याचे सांगून मुंबईच्या झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकून करोडोची लूट करुन पळून गेल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ४ अज्ञात लोकांनी छापा टाकला आणि स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले.

आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने जप्त केले व अधिक तपासासाठी ईडी कार्यालयात येण्यास सांगितले. यानंतर २५ लाख रुपये रोख आणि एक कोटी ७० लाख रुपये किंमतीचे सोने घेऊन ते पसार झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ४ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या दुकानात आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment