Wednesday, May 7, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

आयसीसीचा २०२२चा एकदिवसीय संघ जाहीर

आयसीसीचा २०२२चा एकदिवसीय संघ जाहीर

लंडन (वृत्तसंस्था) : आयसीसीने मंगळवारी २०२२चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष संघ जाहीर केला आहे. आयसीसीच्या या ‘टीम ऑफ द ईयर’मध्ये भारताच्या श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.


वर्ष २०२२च्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही देशाच्या दोनपेक्षा जास्त खेळाडूंचा संघात समावेश नाही. वर्षभरातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करणाऱ्या खेळाडूंचा आयसीसीच्या या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष एकदिवसीय संघात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि भारतातील प्रत्येकी २ खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.


बाबर आझम (पाकिस्तान), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), शाई होप (वेस्ट इंडिज), श्रेयस अय्यर (भारत), टॉम लॅथम (यष्टीरक्षक, न्यूझीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), मेहंदी हसन (बांगलादेश), अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज), मोहम्मद सिराज (भारत), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), अॅडम झम्पा (ऑस्ट्रेलिया) असा आयसीसीचा २०२२चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष संघ आहे.

Comments
Add Comment