Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिकमजेत मस्त तंदुरुस्तअ‍ॅसिडिटी का होते? त्याच्यावरील सोपे उपाय

अ‍ॅसिडिटी का होते? त्याच्यावरील सोपे उपाय

मुंबई: करपट ढेकर यायला लागले की आपल्याला लगेच अ‍ॅसिडिटी झाल्याचे समजते. पण ती होऊ नये आणि झाल्यावर काय करावे याबद्दल योग्य माहिती वेळीच मिळणे गरजेचे असते. सध्या धकाधकीच्या आयुष्यात अ‍ॅसिडिटी होतेच. मग अशावेळी काय करायचं हे जाणून घेऊया. अ‍ॅसिडिटीटीवर उपाय करण्याआधी त्याची कारण समजून घेणं महत्वाचं आहे.

अ‍ॅसिडिटीची कारणे-

 • जीवनशैलीतील चुकीच्या सवयी
 • धूम्रपान किंवा मद्यपान
 • मसालेदार पदार्थांचे सेवन
 • व्यायाम न करणे
 • सतत तणाव घेणे

अ‍ॅसिडिटीची कारणे तर आपण जाणून घेतली पण सतत धावपळ केल्यामुळे आपल्याला खाण्या पिण्याच्या वेळा पाळणं जमत नाही आणि अ‍ॅसिडिटी होतेच. आपल्याला अ‍ॅसिडिटीटी झालीच तर त्याची लक्षणं काय असतात हे समजून घेऊ.

अ‍ॅसिडिटीची लक्षणे-

 • छातीत जळजळ
 • सतत ढेकर येणे
 • पोटात दुखणे
 • मळमळणे
 • आंबट उलट्या होणे
 • जेवल्यावर पोट फुगणे

अ‍ॅसिडिटी सतत होत राहिल्यास रुग्णाला अल्सर होण्याची शक्यता असते. या रुग्णांना पचनसंस्थेचे कर्करोगदेखील होऊ शकतात.

अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय –

 • बराचवेळ उपाशी राहणे टाळावे.
 • मद्यपान, धुम्रपान करु नये.
 • जेवणानंतर शतपावली करावी
 • ध्यानधारण करावी, त्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
 • जेवणात हिरव्या पाले भाज्या खाव्यात.
 • दिवसातील वेळेनुसार आहार घ्यावा
 • रात्री हलका आहार घेणे उत्तम
 • शेवटी आणि सर्वात महत्वाचे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.

(वरील मजकूर सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापुर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -