Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पतंगाच्या मांज्याने गळा कापून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

पतंगाच्या मांज्याने गळा कापून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

मनोर(वार्ताहर) : पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापल्याने पालघर जिल्ह्यातील गालतरे गावच्या हद्दीत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कारच्या सनरूफमधून कारबाहेर डोकावत असतांना आठ वर्षीय मुलाचा गळा कापला होता. गळ्यावर झालेल्या जखमेतून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने जात असतांना वाटेत त्याचा मृत्यू झाला. दिशान तिवारी असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी हमरापूर-नाणे रस्त्यावर गालतरे गावच्या हद्दीत ही घटना घडली. मुंबईतील कांदिवली येथून तिवारी कुटुंबीय रविवारी हमरापूर नाणे रस्त्यावरील गालतरे येथे आले होते. मुलगा कारमध्ये उभा राहून कारच्या सनरुफमधून कारबाहेर डोकावून रस्त्यावर डोंगर आणि निसर्ग सौंदर्य न्याहाळत होता. यावेळी अचानक पतंगाचा नायलॉन मांजा दिशानच्या गळ्यात अडकल्याने त्याचा गळा कापला गेला व त्याच्या मोठी जखम झाली. लागलीच त्याला उपचारासाठी महामार्गावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मोठ्या प्रमाणात सुरू असलेला रक्तस्राव आणि मानेची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते, परंतु रुग्णवाहिकेच्या प्रवासादरम्यान आई-वडिलांच्या मांडीवरच त्याचा दुःखद अंत झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >