Sunday, April 20, 2025
Homeमहत्वाची बातमीबेस्टकडून १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

बेस्टकडून १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्टकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे महागाईमुळे त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना लवकरच आणखी एक झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यामुळे एप्रिलपासून मुंबईकरांच्या वीज बिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्टकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये आता बेस्टनेही दरवाढ सुचवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना महागाईची झळ आणखी सोसावी लागण्याची चिन्हे आहेत. बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळारा आहे. या वीज ग्राहकांसाठी बेस्टने ६ टक्के शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबईकरांना महागाईचा झटका बसणार आहे. महावितरणकडून भांडुप, मुलुंड या भागांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो. वीज दरवाढीबाबत आता प्रस्ताव सादर झाल्यानंतर वीज नियामक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीनंतर वीज नियामक आयोगाकडून अंतिम दरवाढ जाहीर करण्यात येईल.

एकीकडे महागाईच्या झळा सर्वसामान्य माणूस सोसत असताना आता वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मुंबई शहरात बेस्ट आणि टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येतो. तर, मुंबई उपनगरात अदानी पॉवर, टाटा पॉवर आणि काही भागांमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो.

युनिट आणि वीज दरवाढ

दरम्यान या वर्षीसाठी बेस्टने वीज दरवाढीत १८ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये १८ टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिट पर्यंत १८ टक्केपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव बेस्टकडून ठेवला आहे. तर १०१ ते ३०० युनिट पर्यंत ६ टक्केपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव आहे. तर ३०१ ते ५०० युनिट व त्यापुढे सुद्धा दोन टक्के पर्यंत वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -