मुंबई : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. त्यांना आव्हान देणारे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना आता अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचे समोर आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात व्यक्तीने तुमचाही दाभोलकर करू अशी धमकी दिली आहे. अत्यंत अश्लील भाषेत मानव यांना व्हॉटसअपवर धमकी दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. तातडीने मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावरील आरोपानंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.
श्याम मानव सध्या नागपूरच्या रवी भवन येथील कॉटेजमध्ये मुक्कामी असून त्यांच्या कॉटेज बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.