मुंबई : मुंबईतल्या वरळी परिसरात एका नराधमाने अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बाळाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३५ वर्षांच्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलामांर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतल्या वरळी परिसरातील एक कुटुंबात १८ महिन्यांच्या मुलीची आई घराबाहेर गेली होती. तेव्हा नराधमाने या मुलीला स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अत्याचार झाल्यामुळे अवघ्या अठरा महिन्यांची मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती. तिचा टाहो असह्य होऊन कुटुंबाने तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली, तेव्हा या मुलीवर अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे आई-वडिलांसह कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जात तक्रार नोंदवली.
अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर नराधमाने अत्याचार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि रोष आहे. बाळ सुरक्षित नसेल, तर कसे, असा सवाल विचारला जातो आहे. याप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.