औरंगाबाद : राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची माहिती ‘ईडी’ने मागवल्याने खळबळ उडालेली असताना यात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणारी माहिती समोर आली आहे. तीस-तीस घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड सध्या हर्सूल कारागृहात असून त्याने केलेल्या एका फोन कॉलच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यात ‘ईडी’ने माहिती मागवल्याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे संतोष राठोड न्यायालयीन कोठडीत असताना त्याला मोबाईल मिळाला कसा, त्याला फोन कोण पुरवतो? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तुरुंग मुख्य अधिकारी अरुणा मुगूटराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ तारखेला संतोष राठोड याला सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी हे संभाषण झाले असावे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे संभाषण कारागृहातून झाले असेल किंवा न्यायालयात हजर करताना झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संतोष राठोडला न्यायालयात घेऊन जात असताना औरंगाबाद शहर पोलिसांचा एक अधिकारी आणि चार कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे त्यांनी हे संभाषण करु दिले का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष राठोड याने संभाषण केलेला व्यक्ती, त्यांचा नातेवाईक आहे. तसेच पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील हा व्यक्ती आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची राजकीय पार्श्वभूमी असून, एका मंत्र्याचा जवळचा असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकारची पोलीस चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षी गाजलेल्या मराठवाड्यातील तीस-तीस घोटाळ्यात ‘ईडी’ची एन्ट्री झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. तर यात अनेक राजकीय नेत्यांची देखील नावे असल्याने खळबळ उडाली आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…