Wednesday, July 17, 2024
Homeमहत्वाची बातमीशेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या

शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. नागपूर येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील सुरेवानी गावात ही घटना घडली. या घटनेत तीन आरोपींनी वेळ साधत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून नराधम तिच्याकडे गेले आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागले. मात्र महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर देखिल महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला. त्यामुळे नागपूरमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -