Thursday, July 3, 2025

पुणे अन् चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर

पुणे अन् चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर

पुणे : महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणूकीसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड येथे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.


या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.


या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

Comments
Add Comment