देवगड (वार्ताहर) : आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण वारगाव जि. प. प्राथमिक शाळा क्र. ३, देवगड आरेश्वर प्राथमिक या दोन्ही शाळांना संगणक संच व तरेळे येथील वामनराव महाडिक माध्यमिक शाळेला कलर प्रिंटर भेट देण्यात आले. त्याचबरोबर शेतकरी संघाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा साफ धुव्वा उडविल्याबद्दल आमदार नितेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक मूर्ती देऊन त्यांचे अभिनंदन केले.
त्याच बरोबर हसनाडी देवगड येथील गावी हळदीकुंकू निमित्त साड्या, कुंकू व श्री महालक्ष्मी देवीचा प्रसाद वाटप केला. या प्रसंगी वारगाव उपसरपंच नानासाहेब शेट्ये, माजी सरपंच रमाकांत राऊत, उरफान मुल्ला, तरेळे शाळेचे अविनाश मांजरेकर, वारगाव शाळा क्र. ३ च्या कल्पना सावंत, सत्यवान केसरकर, आरेश्वर शाळेचे खोचरे, गोट्या पांगेरकर, भाजप उत्तर भारतीय मोर्चा मुंबई उपाध्यक्ष अरविंद अवस्थी व द. मुंबई उपाध्यक्ष व ओबीसी मोर्चा मुंबई प्रदेश सचिव विजय घरत उपस्थित होते.