Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीसलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही वाईट

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही वाईट

मुंबईचा एक्यूआय ३०६ वर तर दिल्लीतील एक्यूआय २४२ वर

मुंबई : राज्यात सध्या थंडी वाढत आहे. मुंबईच्या वातावरणात गारवा जाणवत असला तरी मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीत आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३०६ वर तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक २४२ वर गेला आहे.

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक मागील काही दिवसात ३०० पार गेला आहे. मुंबईतील घटते तापमान, वाऱ्यांचा मंद वेग आणि वाहतूक समस्येमुळे हवा गुणवत्ता यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच खराब स्थितीत आहे. यामुळे आरोग्य विषयक समस्या, श्वसनाचे विकारसारख्या गोष्टींना मुंबईकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ३००च्या पुढेच राहणार आहे. मुंबईतील हवेत पीएम २.५ चे प्रमाण अधिक आहे. जो मुंबईकरांसाठी अतिशय धोकादायक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीएम २.५ चे प्रमाण जास्त असल्याने अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार आणि फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग आणि हृदयविकाराचा धोकाही उद्भवू शकतो.

मुंबईतील एक्यूआय पुढीलप्रमाणे…

  • कुलाबा – 290
  • नवी मुंबई – 352
  • अंधेरी – 326
  • चेंबूर – 347
  • बीकेसी – 361
  • माझगाव – 322

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?

शून्य ते 50 एक्यूआय – उत्तम
50 ते 100 एक्यूआय – समाधानकारक
101 ते 200 एक्यूआय – मध्यम
201 ते 300 एक्यूआय – खराब
301 ते 400 एक्यूआय – अतिशय खराब
401 ते 500 एक्यूआय – गंभीर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -