Tuesday, March 18, 2025
Homeमहत्वाची बातमीमहाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ कंपन्यांसोबत करार, १० हजार तरुणांना मिळणार रोजगार

दावोस : स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात १० हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सोमवारीच दावोसमध्ये आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या कंपन्यांसोबत झाले करार

ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट्स – १२,००० कोटी
बर्कशायर हाथवे होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – १६,०० कोटी
आयसीपी गुंतवणूक/ इंडस कॅपिटल – १६,०० कोटी
रुखी फूड्स – २५० कोटी
निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया – १,६५० कोटी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -