चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला शनिवारी हजर होण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली तर उर्फीने वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. उर्फी जावेदवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती.
चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिले होते, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणा-या उर्फी जावेदवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी.’