Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

गडकरींना दाऊदकडून जीवे मारण्याची धमकी

गडकरींना दाऊदकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुर येथील त्यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींकडे खंडणी मागण्यात आली आहे.


नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह एटीएस, एएनओसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गडकरी यांच्या वर्धारोडवरील निवासस्थानावर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी मिळल्याच्या वृत्ताला पोलीस आणि गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी दुजोरा दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता फोन आला. फोनवरून बोलणा-या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तसेच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियान पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Comments
Add Comment