पुणे : पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर डॉग स्कॉडच्या मदतीने संपूर्ण पुणे रेल्वे स्थानकाची शनिवारी सकाळी कसून तपासणी केली असता रेल्वे स्थानकामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी आल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला असून प्रवाशांच्या सामानाचीदेखील तपासणी केली जात आहे.
दरम्यान, धमकीचा फोन मनमाडमधून आल्याने पोलिसांचे एक पथक मनमाडला रवाना झाले आहे.