Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

जदयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांचे निधन

जदयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांचे निधन

पाटना : जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. शरद यादव यांचे पार्थिव शुक्रवारी दिल्लीतील छतरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.


गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी मध्य प्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी गुरुवारी रात्री ११.४५ वाजता सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची माहिती दिली. 'पापा इज नो मोअर' असे शुभाशीनीने ट्विटमध्ये लिहिले आहे.


शरद यादव हे अनेक दिवसांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते. त्यांचे डायलिसिस करण्यात येत होते. फोर्टिस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्यूटने एक निवेदन जारी करून सांगितले की, गुरुवारी त्यांना बेशुद्ध अवस्थेत फोर्टिस इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले. ते मध्य प्रदेशातील नर्मदापुरम (होशंगाबाद) जिल्ह्यातील बबई येथील रहिवासी होते. त्यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला होता.

Comments
Add Comment