पुणे : वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला असून त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बंडातात्या कराडकर यांच्याकडे वारकरी संप्रदायातील धडाडीचे नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. व्यसनमुक्ती चळवळ, वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी पहिली संस्था या कार्याबरोबरच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही बंडातात्या कराडकर करतात. त्यामुळे त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. इतकेच नाही तर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील ते कायम चर्चेत असतात.