कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापूर कागलमधील घरी ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहा वाजता जवळपास २० अधिकारी अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहचले.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखान्यातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती.
यापूर्वीही जुलै २०१९ मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती.
आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता.