मुंबई : उत्तर भारतातील शीतलहर तसेच दाट धुक्यामुळे राज्यातही थंडीची लाट आली आहे. बुधवारपासून अनेक ठिकाणी तापमानात आणखी ३ ते ४ अंशाने घट होणार असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. यामुळे बुधवारपासून मुंबईसह कोकणातही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे.
राज्यात मंगळवारी बहुतेक ठिकाणी किमान तापमानात १ अंशाने घसरण झाली. राज्यातील १० शहरांतील पारा दहा अंशाखाली होता. नाशिक जिल्ह्यातील ओझरला पुन्हा राज्यातील नीचांकी ४.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकात पारा ७.६ तर औरंगाबादेत ७.७ वर होता.
विविध शहरांतील किमान तापमान
- ओझर ४.९
- जळगाव ५.३
- धुळे ५.५
- पुणे ७.४
- नाशिक ७.६
- औरंगाबाद ७.७
- गोंदिया ८.६
- गडचिरोली ९.२
- नागपूर ९.२
- यवतमाळ ९.५