Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडी"संजय राऊत भांग पिऊन आमच्यासोबत फोटो काढला का?"

“संजय राऊत भांग पिऊन आमच्यासोबत फोटो काढला का?”

नाशिक : शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर संजय राऊत यांनी या प्रवेशावर टीका करत आम्ही या कार्यकर्त्यांना ओळखत नाही, ते पालापाचोळा आहेत, असेही संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊत यांच्या या टीकेला उत्तर देत या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी त्यांना ओळखत नाही असे राऊत म्हणाले. त्यावर राऊत यांच्यासोबतचे फोटो दाखवत या पदाधिकाऱ्यांनी राऊत भांग खाऊन आमच्यासोबत फोटो काढले आहेत का? असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राऊत यांच्यासोबतचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले.

सिल्व्हर ओकवर जाऊन तुम्ही भांग खाऊन येता का? आम्हाला ओळखत नाही तर खांद्यावर हात टाकून फोटो का काढता? असा सवाल करत ते फक्त शिवसैनिकांचा कामापुरता उपयोग केला जात आहे. यांना दगड फेकण्यापूरत वापरता आणि त्यांनाच पालापाचोळा म्हणता असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले.

संजय राऊत कधी रस्त्यावर उतरले. हे फक्त शिवसैनिकांमुळे येथे आहेत. राऊत फक्त शरद पवार यांच्याकडे जातात आणि शिवसेना कशी संपवायची हे शिकून येऊन १० वाजता बोलतात. आम्ही शिवसेना काय आहे ते दाखवू हिम्मत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तिथ येतो. आमच्या मागे आता शिंदे साहेब आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला तुडवातुडवी काय असते ते दाखवतो, असे पदाधिकारी यावेळी बोलताना म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -