Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमी...तर रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे संजय राऊतला चप्पलेने मारतील : नारायण राणे

…तर रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे संजय राऊतला चप्पलेने मारतील : नारायण राणे

मुंबई : शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतने घेतलेली आहे. संजय राऊत हा राजकारणातला जोकर आहे, अशी घणाघाती टीका करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे.

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडपतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली. तसेच संजय राऊत जिथे बोलावतील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार आहे, असेही जाहीर आव्हान त्यांनी राऊत यांना दिले आहे.

शिवसेनेच्या १९ जून १९६६ पासून पहिल्या ४० वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ती संजय राऊतने घेतलेली आहे. आज त्याला शिवसेना संपवल्याचा आनंद होत आहे. ५६ आमदार होते आता १२ पण राहिलेले नाही. संजय राऊतचे एकतरी विकासात्मक काम सांगा. संपादक म्हणून त्यांनी लिहिलेला एकतरी बौद्धीक लेख दाखवा. लेखातून शिव्या देण्यापलिकडे काही काम तो करत नाही.

एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. कशासाठी माहित आहे का? मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत येऊन माझ्या बाजूला बसायचा आणि उद्धव ठाकरे तसेच रश्मी ठाकरे यांच्याबाबत जे काही सांगायचा ना ते उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून रश्मी आणि उद्धव ठाकरे यांनी संजयला चप्पलेने नाही मारलं तर मला विचारा, अशी टीका राणे यांनी केली.

‘संजयने ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा’

“शिवसेना संपवण्याची सुपारी मी नाही तर संजय राऊतने घेतली आहे. शिवसेना संपवली याचा त्याला आनंद होत आहे,” असा दावा नारायण राणे यांनी केला. “हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे. संजयने ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा. असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही संजय राऊतबद्दल विचारु नका, असे राणे म्हणाले. संजय राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारा विष असल्याची टीका राणे यांनी केली.

जिथे बोलावशील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार

जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर नारायण राणे म्हणाले की, “मी मला सुरक्षा मागितलेली नाही. मला आज नाही तर १९९० पासून संरक्षण आहे. तेव्हा तो शिवसेनेत नव्हता. तो शिवसेनेविरुद्ध लोकप्रभामध्ये लेख लिहित होता. पण आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलावशील तिथे मी सर्व सुरक्षा सोडून यायला तयार आहे.”

‘संजय राऊत हे राजकारणातले जोकर’

आजच्या राजकारणाला संजय राऊत हा जोकर आहे. शिव्या घालण्यापलीकडे तो काही करत नाही. त्याने सामाजिक, आर्थिक, धार्मिक असे कोणतेच काम केलेले नाही, असे नारायण राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -