Friday, March 21, 2025
Homeदेशकॉल ड्रॉपने जिओ आणि एअरटेलचे यूजर त्रस्त

कॉल ड्रॉपने जिओ आणि एअरटेलचे यूजर त्रस्त

5G सर्विस येताच 4G नेटवर्क यूजर्सच्या कॉल ड्रॉपमध्ये वाढ

मुंबई : देशातील दोन खासगी कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलने देशात 5G नेटवर्क सुरू केले आहे. 5G नेटवर्क भारतात वेगाने पसरवले जात असताना अनेक शहरात आता 5G सर्विस मिळायला सुरुवात झाली आहे. Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या दररोज देशातील कोणत्या ना कोणत्या शहरात आपली 5G सर्विस सुरू करीत आहेत. मोबाइल यूजर्सला सुपरफास्ट 5G Internet Speed देण्याचा दावा करीत आहेत. परंतु, 5G नेटवर्क आल्यापासून 4G नेटवर्क मध्ये समस्या येत आहे.

सध्या 4जी सेवा खूपच खराब सुरू आहे. लो नेटवर्क कव्हरेज, स्लो इंटरनेट, तसेच कॉल ड्रॉप अशा अनेक समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. देशात अनेक ठिकाणी 4G नेटवर्क मध्ये समस्या येत आहे. Jio आणि Airtel नंबरवर लो नेटवर्क, स्लो इंटरनेट तसेच कॉल ड्रॉपची समस्या पाहायला मिळत आहे. अनेक ग्राहकांकडून आरोप केला जात आहे की, 5G च्या चक्करमध्ये 4G सेवा खराब होत आहे.

रिलायन्स जिओ आणि एअरटेल कस्टमर्सला खराब 4जी सेवेचा सामना करावा लागत आहे. याचा मागील आठवड्यात मोबाइल सेवेवर खूप परिणाम झाला होता. यूजर्सला नेटवर्क आणि इंटरनेट दोन्हीच्या क्वॉलिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मोबाइल मध्ये सिग्नल खूप कमी येत आहे. अनेकदा सिग्नल असूनही इंटरनेट डेटा कनेक्टिविटी मिळत नाही.

डिसेंबर २०२२ पासून Reliance Jio आणि Airtel कस्टमर्सला कॉल ड्रॉपची समस्या येत आहे. आपल्या स्वतःचा अनुभव विचारल्यानंतर अनेकांनी नंबरवर कॉल करण्यास वेळ लागत असल्याचे म्हटले आहे. अनेकांना कॉल कनेक्ट करण्यास अडचण येत आहे. जर फोन लागला तर मध्येच कॉल कट होत आहे. हा कॉल ड्रॉपचा प्रोब्लेम वारंवार येत आहे. ज्यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. फोनवर बोलत असताना व्हाइस क्वॉलिटी सुद्धा व्यवस्थित येत नाही.

लो नेटवर्क कव्हरेज व कॉल ड्रॉप सारखी समस्या सोबत मोबाइल यूजर्सला इंटरनेट संबंधी समस्या येत आहे. 4G रिचार्ज प्लान असूनही स्मार्टफोन वर 3G हून कमी इंटरनेट स्पीड मिळत आहे. फोनमध्ये इंटरनेट कनेक्टेड दिसत असले तर ब्राउजर ओपन केल्यास साइट ओपन होण्यास उशीर लागत आहे. काही यूजर्सला तर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI Apps सुद्धा ओपन होण्यास अडचण येत आहे.

वारंवार नेटवर्क मध्ये समस्या येत आहे. ही समस्या अनेक परिसरात येत आहे. त्रस्त झालेले यूजर्सला कळत नाही की, या समस्येनंतर काय करायचे. जिओ आणि एअरटेल सारख्या टेलिकॉम ऑपरेटर आपल्या नेटवर्कला 5जी वर अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रक्रियामुळे कंपनीचे 4जी नेटवर्कमध्ये समस्या येत आहे. सर्वात आधी, सर्वात जास्त आणि सर्वात फास्ट 5जी सर्विस देण्याच्या प्रयत्नात ही समस्या येत आहे का, याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -