रस्त्याच्या डाव्या बाजूने नाही तर उजव्या बाजूने चाला

  253

रस्ते अपघात टाळण्यासाठी 'वॉक ऑन राईट' उपक्रम


नांदेड : पादचाऱ्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 'वॉक ऑन राईट' हा उपक्रम राबवण्यात आला. रस्त्यावर चालताना समोरून येणारी वाहनं आपल्याला दिसावीत आणि त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यासाठी नांदेड जिल्ह्यात उजव्या बाजूने चाला 'वॉक ऑन राईट' ही अभिनव मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.


रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन, यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. पूर्वीच्या प्रघातानुसार आपण डाव्या बाजूनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने अधिर बळी गेले आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालताना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने नांदेड जिल्ह्यात 'उजव्या बाजूने चाला', 'वॉक ऑन राईट' ही अभिनव मोहिम आज प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.


या अभिनव मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदिर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवरांनी रॅली काढून, उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात केली आहे. दरम्यान या उपक्रमात जिल्हाभरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.


रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघातात सातत्याने वाढ होत आहे. बहुतेक अपघात हे रस्त्यांवरील हिट-अँड-रन प्रकरणे आहेत. जेथे प्रामुख्याने वाहनांची वर्दळ कमी असते आणि अपघातानंतर वाहनचालकांना घटनास्थळावरून पळून जाण्यास अधिक वाव असतो. २०२१ मध्ये या उत्तर महाराष्ट्रात २ हजार ५३० जीवघेणे अपघात झाले. हीच बाब लक्षात घेऊन हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना अटक करून न्यायालयात खटला चालवला जाईल, याची काळजी घेण्याच्या सूचना धुळे, नंदुरबार, जळगाव अशा पाच पोलिस युनिटच्या पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार 2021 मध्ये 4,12,432 रस्ते अपघात झाला आहेत. यामध्ये एक लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वर्षभरात तीन लाख 84 हजार 448 जण रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. 2020 मध्ये झालेल्या रस्ते अपघाताच्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघाताची संख्या कमी आहे. त्याशिवाय 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचं प्रमाणही कमी आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण 14.8 टक्केंनी कमी आहे. तर रस्ते अपघाताचं प्रमाण 8.1 टक्केंनी कमी आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी