Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीवृद्धाची संपत्ती लूटून प्रेयसी फरार! पोलिसांची तक्रार नोंदवण्यास नकार!

वृद्धाची संपत्ती लूटून प्रेयसी फरार! पोलिसांची तक्रार नोंदवण्यास नकार!

औरंगाबाद : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ६० वर्षांच्या व्यक्तीची सुमारे २० लाखांची संपत्ती घेऊन त्याची ४० वर्षीय प्रेयसी दुस-या प्रियकरासोबत फरार झाली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यामुळे त्यांना कोर्टात दाद मागावी लागली. अखेर कोर्टाने सर्व प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर छावणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरात पडेगाव भागातील चैतन्य नगर येथील एक ६० वर्षीय रहिवासी हे एमएसईबी मधून सुरक्षा रक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यांचा १९९१ मध्ये विवाह झाला. त्यांना दोन मुली देखील आहेत. परंतू पत्नीशी पटत नसल्यामुळे ते वेगळे राहत होते. दरम्यानच्या काळामध्ये राधा बलुतकर (वय ४० वर्ष, रा. चैतन्य नगर, पाडेगाव) हिच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले.

काही दिवसांनी राधा आणि त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले. तू वयोवृद्ध आहेस असे म्हणत राधा त्यांना त्रास देऊ लागली. राधाचा त्यांच्या संपत्तीवर डोळा होता. तिचे दौलताबादच्या आसिफ या व्यक्तीशी सूत जुळले होते, अशी माहितीही आता समोर आली आहे.

आरोपी राधाने त्यांना, ‘तुम्ही वृद्ध झालात, तुम्हाला अनेक आजारही आहेत, तुम्ही कामाचे नाहीत, असे म्हणत तुमची पेन्शन व सर्व पैसे माझ्याकडे द्या नाहीतर मी तुमच्याकडे राहणार नाही आणि तुमच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर याची कुठे वाच्यता केलीत तर आसिफच्या मदतीने तुमचे बर-वाईट करु, अशी धमकी सुद्धा दिली होती.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे राधाने त्यांची लिव्ह इन पार्टनर नसून दत्तक मुलगी असल्याचा बॉन्डही लिहून घेतला होता.

एकेदिवशी संधी साधून राधाने घरातील सोने आणि रोख रक्कम मिळून एकूण २० लाखांची रक्कम घेऊन तिने आसिफ सोबत पलायन केले. तेव्हा आपण पुरते फसलो गेल्याचे या वृद्धाच्या लक्षात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -