उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा सुनावले
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असे म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका करत चित्रा वाघ यांनी पोलिसांत उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली होती. शिवाय उर्फीनेही चित्रा वाघ यांना उत्तर दिले होते. आता तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
आता उर्फीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी छायाचित्रकार उर्फीला तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना तू काय सांगशील? असं विचारतात. यावर उर्फी म्हणते, “प्रेमाचं माहित नाही पण माझा नंगानाच सुरूच राहिल.”
उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी उर्फीला ट्रोलही केले आहे. ही पागल मुलगी आहे, तुझं हे कृत्य लवकरच थांबवण्यात येईल, ही नेहमी विमानतळावर काय करते, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.