Friday, May 9, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

आमदार नितेश राणे यांचा अजित पवारांवर पलटवार

आमदार नितेश राणे यांचा अजित पवारांवर पलटवार

मुंबई : धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले आहे. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. तसेच हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची‘ टीका सहन होत नाही. त्यामुळेच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.


अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत खोचक शब्दात टीका केली होती.


राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानावर आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.


छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्वीट अजित पवारांवर टीका केली होती. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले होते.


आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले होते. याबाबत अजित पवारांनी विचारलं असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेनंतर नितेश राणे पलटवार वार केला आहे.


अजित पवार काय म्हणाले होते?


अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाकडून अनेक ठिकाणी निर्देशने करण्यात येत आहेत. दरम्यान, काल अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना नितेश राणेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, ‘टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील, असं ते म्हणाले होते.


नितेश राणेंनी काय टीका केली होती?


अजित पवार यांनी संभाजी महाराजांबाबत तसेच जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. “आपण औरंगजेबाबाबत ‘औरंजगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असता ना?’ असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केलं नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही,” असे ते म्हणाले होते.

Comments
Add Comment