मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असे वक्तव्य केले आणि नव्या वादाला तोंड फूटले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असते ना? असे वक्तव्य करुन आणखी भर टाकली. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या वक्तव्यांनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांना पत्र लिहिले आहे. असे वक्तव्य आव्हाडांनी करणे स्वाभाविकच आहे, कारण यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे. हे केव्हाच सिद्ध झाले आहे, असे राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
To @Awhadspeaks pic.twitter.com/xXOkHbdnpM
— nitesh rane (@NiteshNRane) January 4, 2023
आमदार राणे यांनी पत्रात म्हटले आहे की, औरंगजेबाबत औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असते ना? त्यांनी हे असे वक्तव्य करणे सहाजिकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तह आयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झाले नाहीत किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे पाय कधीही वळाले नाहीत.
राणे यांनी या पत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. काकाप्रमाणे पुतण्यातही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे घोषित करतात. औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता, मी आपल्याला या पत्रासोबत औरंगजेबाने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे, असे म्हणत त्यांनी पत्रासोबत औरंगजेबाने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी दिली आहे.
ही मंदिरे औरंगजेबाने तोडली
१) सोमनाथ मंदिर
२) कृष्ण जन्मभूमी मंदिर
(३) काशी विश्वनाथ मंदिर
४) विश्वेश्वर मंदिर
५) गोविंददेव मंदिर
६) विजय मंदिर
७) भीमादेवी मंदिर
८) मदन मोहन मंदिर
९) चौषष्ठ योगिनी मंदिर
(१०) एलोरो मंदिर
११) त्र्यंबकेश्वर मंदिर
१२) नरसिंगपूर मंदिर
१३) पंढरपूर मंदिर