Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीधनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात

धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात

छातीला फ्रॅक्चर पण मुंडे म्हणतात, काळजी करण्यासारखे नाही!

पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला काल रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अपघात झाला. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. यात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले जाणार आहे. दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानाने धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना होतील. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत अपघातासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांच्या गाडीला साडेबारा वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. अपघातानंतर धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -