मुंबई : महाराष्ट्राच्या गृह विभागाने बुधवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
राज्य सरकारने प्रथमच मुंबई विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केली आहे. १९९४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, देवेन भारती यांना यापूर्वी जॉइंट कमिशनर कायदा व सुव्यवस्था, मुंबई पोलिस जॉइंट सीपी, ईओडब्ल्यू आणि अतिरिक्त सीपी क्राइम ब्रँच या पदावर नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही होते.