Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीम्हाडाचे घर घेण्यासाठी आता फक्त ६ कागदपत्रे लागणार

म्हाडाचे घर घेण्यासाठी आता फक्त ६ कागदपत्रे लागणार

मुंबई : म्हाडाचे घर घेण्यासाठी कागदपत्राची संख्या २१ वरुन आता केवळ सहा ते सात कागदपत्रांवर आणत म्हाडाने प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. त्यामुळे म्हाडाचे घर घेणे आता सोपे होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

म्हाडाच्या सोडत प्रक्रियेमध्ये आतापर्यंत सोडतीनंतर अर्जदाराची पात्रता निश्चित करण्यात येत होती. अर्ज भरताना २१ कागदपत्रे जोडणे गरजेचे होते. पण आता म्हाडाने ही सर्व प्रक्रिया एका अॅपद्वारे आणि कमी कागदपत्रांसह राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या नवीन पद्धतीनुसार अर्जदाराची पात्रता आता सोडतीपूर्वीच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल. यासाठी केवळ सात कागदपत्राची आवश्यकता असेल. अर्जदाराने जोडलेली कागदपत्र डीजी लॉकरमध्ये सुरक्षित राहणार आहेत. घरे मिळाल्याची माहिती अर्जदाराला एसएमएस व ईमेलद्वारे दिली जाणार आहे.

फक्त ही कागदपत्रे आवश्यक

१. ओळखीचा पुराव्यासाठी आधारकार्ड व पॅनकार्ड (आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक)
२. स्वघोषणापत्र
३. अर्जदाराच्या आधारकार्डवरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा वास्तव्याचा पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.
४. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र – तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र
५. स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा – आयकर परतावा किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा. (पती/ पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावाः नोकरी असल्यास पती- पत्नीचा आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा आणि स्वयंघोषणापत्र)
६. जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर प्रवर्गानुसार प्रमाणपत्र

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -