भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.


पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.‌ १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले.


१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.

Comments
Add Comment

Govind Pansare : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाकडून तिघांना जामीन; सर्वच्या सर्व '१२' संशयित आरोपींची सुटका!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणासंदर्भात आज एक

Gadchiroli : ब्रेकिंग! गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सरकारला मोठं यश

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव; धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने

रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेतून २.३० किलो सोने लंपास

अमरावती : रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले