Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीशी…ऽऽऽऽ अरे.. हे काय चाललंय मुंबईत?

शी…ऽऽऽऽ अरे.. हे काय चाललंय मुंबईत?

नंगटपणा करणा-या उर्फीला बेड्या ठोकण्याची चित्रा वाघ यांची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेदला उत्तानपणे नंगटपणा करणारी बाई म्हणत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे.

आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्ला अनेकजण तिला देतात. तर काही जण तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतात. दरम्यान, आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर भडकल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अटकेची मागणी करणारे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील टॅग केले आहे. “अरे.. हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवत आहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -