Friday, March 28, 2025
Homeदेशअमेरिकेतल्या कोरोना व्हेरियंटची भारतात एन्ट्री!

अमेरिकेतल्या कोरोना व्हेरियंटची भारतात एन्ट्री!

ओमायक्रॉनच्या जातकुळीतील हा सर्वात धोकादायक व्हेरियंट

गांधीनगर : नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी सुरू असतानाच चीनसह जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यात आता भारताची चिंता वाढवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भारतात बीएफ.७ व्हेरियंटचे रुग्ण आढळले होते. त्यातच आता ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेला व्हेरियंट XBB1.5चा रुग्ण भारतात सापडला आहे. भारतीय सार्स कोव-२ जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या अहवालानुसार डिसेंबरमध्येच हा व्हेरियंट भारतात पोहचला असून गुजरातमध्ये याचा पहिला रुग्ण सापडला आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. याच व्हेरियंटमुळे न्यूयॉर्कमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. XBB व्हेरियंट बीए.२.१०.१ आणि बीए.२.७५ चे म्युटेशन आहे. या व्हेरियंटचा भारतासह जगभरातील ३४ अन्य देशात फैलाव झाला आहे. ओमायक्रॉनच्या जातकुळीतील हा सर्वात धोकादायक व्हेरियंट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

सध्या या व्हेरियंटच्या जेनेरिम फुटप्रिंटवर तज्ज्ञ काम करत आहेत. राज्यात १०० टक्के जिनोमिक सीक्वेंसिग होत आहे. तर, परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग, रॅपिट टेस्टिंग होत आहे. यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जिनोमिक सीक्वेसिंगसाठी पाठवत आहोत, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात २७५ हून अधिक XBB व्हेरियंटचे रुग्ण आहेत. मात्र, XBB.1.5 हा वेगळ्या प्रकाराचा व्हेरियंट आहे. याच्या ट्रान्समिसिबिलीटीबाबत खूप कमी माहिती उपलब्ध आहे.

कोरोनाचे नवीन व्हेरियंट बीएफ.७ चीन, अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्कसह जगभरातील इतर अनेक देशांमध्ये आढळले आहे, परंतु चीनमध्ये या व्हेरियंटचा फैलाव अधिक आहे. इतर देशांमध्ये मात्र तितकासा धोका जाणवत नाही. भारतातही त्याची प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात. तर ओमायक्रॉन व्हेरियंटचे सब-वेरियंट XBB ची प्रकरणे आता समोर येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -