Wednesday, March 26, 2025
Homeमहत्वाची बातमीअमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट!

अमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट!

यूएस देखील चीनप्रमाणे लपवत आहे डेटा

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा XBB15 हा एक नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे. चीनी वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ एरिक फीगेल डिंग यांचे म्हणणे आहे की, हा व्हेरिएंट पूर्वीच्या BQ1 प्रकारापेक्षा १२० पट वेगाने संसर्ग पसरवतो. पूर्वीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात तो अधिक पटाईत आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, नवीन प्रकारानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर याचे प्रमाण कमी होणार नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन सारखे नसून ते एक विशेष रीकॉम्बिनेशन आहे. जे आधीच्या म्यूटेड झालेल्या दोन कोरोना व्हेरिएंटने बनलेले आहे.

XBB15 हा व्हेरिएंट हा कोरोनाचा सुपर प्रकार असल्याने डिंग यांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आरोग्यतज्ज्ञ डिंग यांनी म्हटले की, येथील एका शास्त्रज्ञाने न्यूयॉर्कमध्ये पसरलेल्या या व्हेरिएंटचा अभ्यास केला आहे. त्यांनी सलग १७ ट्विट करित आरोप केला की, चीनप्रमाणे अमेरिकाही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा डेटा लपवत आहे. तर या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आता भारतातील गुजरातमध्येही आढळून आला आहे.

डिसेंबरमध्ये नवीन व्हेरिएंटच्या संसर्गात ४० टक्के वाढ

आरोग्यतज्ज्ञ एरिक यांनी दावा केला आहे की, सीडीसीने गेल्या दोन आठवड्यात XBB15 प्रकाराचे योग्य आकडे जाहीर केले नाहीत. डिंग यांनी अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या काही व्यक्तींचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या मते, कोरोनाची ही आकडेवारी सीडीसीने जाहीर केलेली नाही. एरिकने दावा केला की, केंद्राने नवीन प्रकाराशी संबंधित प्रकरणांमध्ये १ टक्के वरून ४० टक्के पर्यंत उडी दर्शविली आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकेत या नवीन कोरोना प्रकाराच्या प्रकरणांमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.

नवीन प्रकारातील तीन खास गोष्टी…

  1. XBB15 हे कोरोनाचे ‘सुपर व्हेरिएंट’ आहे. XBB15 अवघ्या १७ दिवसात जितक्या लोकांना संक्रमित करत आहे तितका BQ1 हा २६ दिवसात संक्रमित होत आहे.
  2. त्याचे R मूल्य म्हणजेच पुनरुत्पादन मूल्य BQ1 पेक्षा जास्त आहे. आर व्हॅल्यू हे दाखवते की, कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीकडून किती लोकांना संसर्ग होत आहे किंवा होऊ शकतो.
  3. XBB15 ख्रिसमसच्या आधी BQ1 पेक्षा १०८ टक्के वेगाने पसरत होता. ख्रिसमसनंतर हा वेग वाढून १२० टक्के झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -