Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीघाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली

मुंबई : घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन ७२ इंच व्यासाची जलवाहिनी रात्रीच्या सुमारास चांदिवली ब्रिज जवळ अचानक फुटली. जलवाहिनी फुटल्यानंतर घाटकोपरमधील रस्त्यांवर पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून काही भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटल्यानंतर येथील रस्ता खचला आहे.

यामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयातून होणारा पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे एन विभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगर पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन एन प्रभागाचे सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.

खालील विभागातील पाणीपुरवठा राहणार बंद

एन विभाग मधील घाटकोपर उच्चस्तर जलाशय – राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर १ आणि २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओएनजीसी कॉलनी, माझगाव डॉक कॉलनी, गंगावाडी गेट नंबर २, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीचा काही परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -