Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन

जड अंत:करणाने मोदी कर्तव्यावर परतले!

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अंत्यसंस्कारांसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. त्यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला, तसंच पार्थिवासोबत शववाहिनीतून स्मशानभूमीपर्यंत प्रवासही केला.

गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. देशभरातून विविध नेत्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

आई हिराबेन यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात पोहोचले. या ठिकाणाहून ते पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या ७ हजार ८०० कोटीच्या विविध विकास योजनांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर हावडा ते न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

Comments
Add Comment