Friday, May 9, 2025

विदेशक्रीडाताज्या घडामोडी

दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे निधन

दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे निधन

साओ पाउलो : फुटबॉलमधील महान प्लेयर पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप मिळवून देणारे महान फुटबॉलपटू पेले हे गेले काही दिवस साओ पाउलोच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.


त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १ हजार ३६३ सामन्यांत १२८१ गोल केले आहेत. त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली होती. पेले हे इनसाइड फॉरवर्ड खेळणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जायचे.


अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता यांच्या बळावर पेलेची कारकीर्द यशस्वी ठरली. गोल करण्याची त्यांची क्षमता अद्वितीय होती.


त्यांच्या निधनानंतर फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू मेस्सी, रोनाल्डो, एमबाप्पे यांच्यासह जगभरातील त्यांच्या फुटबॉल चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments
Add Comment