Saturday, October 18, 2025
Happy Diwali

सुशांत सिंह खून प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील युवा मंत्री अडकणार

सुशांत सिंह खून प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील युवा मंत्री अडकणार

आमदार नितेश राणे यांचे संकेत

नागपूर : मनसूख हिरेन, दिशा सालियान यांच्या खुनाची माहिती सिनेअभिनेता सुशांत सिंह उघड करणार होता. त्यामुळे त्याचा खून करण्यात आला. सुशांत सिंहच्या खुनाचा मुख्य साक्षीदार रुप शहा याला शासनाने संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता दिशा सालियानच्या सीबीआय चौकशीला ताकद मिळू शकते, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, मनसूख हिरेन, दिशा सालियान यांच्या खुनाच्या संदर्भात सुशांत सिंहला माहिती होती. तो ही माहिती उघड करणार होता. त्यामुळे त्याचाही खून करण्यात आला. रुप शहा याला यासंदर्भात माहिती होती. त्यामुळे रुप शहाच्या जीवालाही धोका होता. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका युवा मंत्र्याचेही नाव पुढे येऊ शकते, असेही संकेत नितेश राणे यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >